पोहा चिवडा ( Poha Chivda )





साहित्य :

किलो जाड पोहे
/ कप डाळ्या
कप शेंगदाणे
१०-१२ काजू अर्धे कापलेले
कप सुके खोबरे
१२-१५ हिरवी मिरची
१२-१५ कढीपत्ता
५० ग्राम सुहाना चिवडा मसाला
चमचा तिखट
चमचा हळद
चवीनुसार मीठ


कृती :

) एका कढईत पोहे माध्यम माचीवर थोडे थोडे तेल घालून शेकून घेऊन एका परातीत काढा
) कढईत तेल घेऊन मिरची, शेंगदाणे, खोबरे, कढीपत्ता, डाळ्या, हळद, तिखट, हे सर्व वेगवेगळे तळून पोह्यामध्ये घेऊन नीट मिक्स करावे
) या मिश्रणात सुहाना मसाला वरतून हळू हळू घेऊन नीट मिक्स करावा. आपला चटकदार चिवडा तयार आहे .
) कापलेले काजू तळता वरतून गार्निश करावे


टीप :

) सर्व साहित्य चिवड्यामध्ये वेगवेगळे तळून घालावे
) सर्व साहित्य माध्यम आचेवर तळणे शेकणे गरजेचे आहे नाहीतर जसे काही पोहे कच्चे राहू शकतात आणि साहित्य करपू शकते
) मिरची आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकता आम्ही चिवडा चटकदार होण्यासाठी जास्त मिरचीचा  वापर केला आहे.
) आपण पोहे तळून घेतले असता अजून चव येईल, परंतु दिवाळीला आपण असेच बरेच फराळ तळूनच घेतो म्हणून पोहे कमी तेल घेऊन भाजले तर उत्तम राहील .यामुळे चवीला जास्त फरक पडणार नाही.


🙏💐 आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏

कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास आपण कंमेन्ट मध्ये विचारू शकता

आमची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या कुटुंब, मित्र परिवार, आणि नातेवाईकांना शेअर करून आमचा उत्साह वाढवा जेणेकरून आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी आणु शकू

आमच्या नवीन रेसिपींची माहिती आपल्या -मेल वर  प्राप्त करण्यासाठी " follow by mail " वर आपला -मेल आयडी ऍड करून " Subscibe " करा .

Post a Comment

0 Comments