Translate in English



साहित्य :

चकलीच्या भाजणीसाठी

३ कप चणाडाळ
४ कप तांदूळ
१ कप मूगडाळ
१ कप उडीदडाळ
१/२ कप साबुदाणा
१/४ कप जिरे
१/२ कप धणे


कृती :

१) सर्व डाळी, तांदूळ वेगवेगळया धुवून वेगवेगळ्या कॉटनच्या कापडावर सावलीत वाळत घालाव्यात.
) तांदूळ, सर्व डाळी ब्राऊनिश रंग येईस्तोवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. तसेच साबुदाणे वेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे सुद्धा भाजून घ्यावेत.
) तांदूळ, सर्व डाळी, , साबुदाणे व इतर पदार्थ एकत्र करून थंड होवू द्यावे. साधारण ४-५ तासानंतर पूर्ण थंड झाले कि बारीक दळून आणावे.


टीप :

१) सर्व डाळी आणि तांदूळ यावरील पावडर ओल्या कापडाने सुद्धा पुसून घेऊ शकता, वेळ वाचेल.तसेच यामुळे डाळी भाजताना वेळ सुद्धा कमी लागतो
२) उडीद आणि मुगडाळ बिनसालाची वापरावी, कारण सालाची वापरल्यामुळे चकलीची चव बिघडते
३) पाणी कमी पडले असता पुन्हा पीठ मळताना कोमट पाणीच घ्यावे थंड पाणी घेऊ नये . 


साहित्य :

चकलीसाठी

४ कप चकलीची भाजणी
३ टेस्पून लाल तिखट
१/२ कप तेल
३ कप पाणी
३ टिस्पून हिंग
४ टिस्पून पांढरे तिळ
१ चमचा ओवा
चवीपुरते मिठ


कृती :

१) ३ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात तेल, हिंग, लाल तिखट, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळून घ्यावे, पाणी उकळले कि गॅस बंद करावा आणि चकलीची भाजणी घालून मिश्रण ढवळावे. 
२) हे मिश्रण १०-१२ मिनीटे झाकून ठेवावे आणि पुन्हा कोमट पाण्याचा हात लावून पीठ मळावे.
३) चकलीच्या साच्याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पीठ चिकटत नाही . साच्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. चकल्या मध्यम आचेवर सोनेरी रंग येई पर्यन्त तळून घ्याव्यात.


टीप :

१) चकलीची उकड गरम किंवा कोमट पाण्याने मळावी
२) चकली तुटत असली तर समजून जा कि पीठ जास्त घट्ट झाले आहे, असे झाले असल्यास कोमट पाण्याचा हाथ लावून पुन्हा पीठ मळून घ्यावे
३) चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागते असे झाले कि चकली झाली असे समजावे. त्याआधी जर चकली तेलातून काढली तर ती नरम होते .


🙏💐 आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏

कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास आपण कंमेन्ट मध्ये विचारू शकता

आमची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या कुटुंब, मित्र परिवार, आणि नातेवाईकांना शेअर करून आमचा उत्साह वाढवा जेणेकरून आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी आणु शकू

आमच्या नवीन रेसिपींची माहिती आपल्या ई-मेल वर  प्राप्त करण्यासाठी " follow by mail " वर आपला ई-मेल आयडी ऍड करून " Subscibe " करा .