साहित्य:

सारणासाठी :
१) १/२ किलो खिसलेले सुके खोबरे
२) पाव किलो रवा भाजलेला
३) पिठीसाखर चवीनुसार गोड ( साधारण १ कप )
४) मिक्सरला एकत्र वाटलेले २ इंच सुंठ, १५-२० वेलचीची पावडर
५) १/२ कप चारोळी, १/२ कप मनुके

करंजीसाठी :
१) १ किलो मैदा
२) १ कप तूप
३) १ कप दूध आणि १/२ कप पाणी 

कृती:
१) सारणासाठी घेतलेले साहित्य एकत्र करून २४ तास मुरत ठेवावे
२) तूप गरम करावे, दूध आणि पाणी एकत्र करून गरम करून घ्यावे
३) मैदयामधे आधी तूप आणि नंतर दूध घालून मळून घ्यावे, मळलेले पीठ २५ मिनिटे झाकून ठेवावे.पुन्हा एकदा पाण्याचा हाथ लावून पीठ मळून घ्यावे
४) २ इंचाचा पिठाचा गोळा लाटून त्यात सारण भरून कातणाने कापून घ्यावे
५) कढईत तेल गरम करून माध्यम आचेवर करंजी सोनेरी रंग होई पर्यंत तळून घ्यावी 

टीप :
१) सारणात पिठी साखर आधीच जास्त घालू नये, कारण मुरल्या नंतर सारण जास्त गोड होऊ शकते म्हणून जर का सारण कमी गोड झाले तर आपण नंतर सुद्धा पिठी साखर घालू शकता 
२) तूप वेगळे गरम करावे दूध आणि पाण्यात मिक्स करू नये.
३)  मैद्याच्या पिठात फक्त पाणी टाकून मळले तरी चालेल, परंतु करंजी खुशखुशीत हवी असेल तर त्यात दूध वापरने खूप गरजेचे आहे.


🙏💐 आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏

कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास आपण कंमेन्ट मध्ये विचारू शकता

आमची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या कुटुंब, मित्र परिवार, आणि नातेवाईकांना शेअर करून आमचा उत्साह वाढवा जेणेकरून आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी आणु शकू

आमच्या नवीन रेसिपींची माहिती आपल्या ई-मेल वर  प्राप्त करण्यासाठी " follow by mail " वर आपला ई-मेल आयडी ऍड करून " Subscibe " करा .