शेव ( Sev )साहित्य :

४ कप बेसन
१ टिस्पून हळद
१ कप पाणी
१ कप तेल
१/२ टिस्पून जिरे पावडर
तेल तळण्यासाठी
चवीपुरते मिठ


कृती :

१) बेसन मध्ये तेल, जिरे पावडर, पाणी, चवीपुरते मिठ, हळद घालून मिक्स करावे.
२) मिश्रण एकदम घट्ट किंवा एकदम पातळ होऊ देऊ नका, साच्यातून बेसन सहज पडेल इतके घट्ट करा
३) साच्यामध्ये बारीक शेवेची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा.
४) कढईत माध्यम आचेवर तेल गरम करावे. साच्यामध्ये भरलेले मिश्रण गरम तेलात चकली आकारात आतून बाहेर अशी गोल शेव पाडावी.आणि माध्यम आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत तळावी
५) तळलेली शेव पेपरवर काढावी आणि हि शेव आपल्याला हव्या त्या आकारात ( लहान, मोठी ) हाताने चुरडून घ्यावी. आपली कुरकुरीत शेव तयार आहे.


🙏💐 आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏

कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास आपण कंमेन्ट मध्ये विचारू शकता

आमची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या कुटुंब, मित्र परिवार, आणि नातेवाईकांना शेअर करून आमचा उत्साह वाढवा जेणेकरून आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी आणु शकू

आमच्या नवीन रेसिपींची माहिती आपल्या ई-मेल वर  प्राप्त करण्यासाठी " follow by mail " वर आपला ई-मेल आयडी ऍड करून " Subscibe " करा .

Post a Comment

0 Comments