शंकरपाळे ( Shankarpale )

Translate in English 




साहित्य:
साधारण सहा कप मैदा
१,१/४ कप दूध
१ कप तूप
दीड कप साखर

कृती:
१) दूध आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे आणि कोमट करून घ्यावे.
२) तूप गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे. मिक्स करून कोमट दुध घालून मैदा भिजवावा. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) २५ मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा लावून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात माध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत.

टीप :
१) पहिले दूध उकळू द्यावे नंतर त्यात साखर घालून वितळू द्यावे, कारण एकसाथ मिक्स करून गरम केले असता दूध फाटण्याची शक्यता असते.
२) तूप वेगळे गरम करावे दूध आणि साखरेत मिक्स करू नये.
३)  दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल परंतु शंकरपाळे खुशखुशीत हवे असतील तर त्यात दूध वापरने गरजेचे आहे.



🙏💐 आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏

कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास आपण कंमेन्ट मध्ये विचारू शकता

आमची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या कुटुंब, मित्र परिवार, आणि नातेवाईकांना शेअर करून आमचा उत्साह वाढवा जेणेकरून आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी आणु शकू

आमच्या नवीन रेसिपींची माहिती आपल्या ई-मेल वर  प्राप्त करण्यासाठी " follow by mail " वर आपला ई-मेल आयडी ऍड करून " Subscibe " करा .

Post a Comment

0 Comments